Quick Overview: RTE Help Centers Maharashtra

  • Coverage: All 36 Districts
  • Total Services: Free Form Filling & Guidance
  • Cost: 100% Free Service
  • Timings: 10:00 AM - 6:00 PM (Working Days)
  • Who Can Visit: Parents needing application help
  • Carry: Original Documents & Xerox Set

RTE Help Centers - जिल्हानिहाय

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील हेल्प सेंटर माहिती

RTE मदत केंद्रांची भूमिका (Services)

  • मोफत अर्ज भरण्याची सुविधा: पालकांना ऑनलाइन अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास मदत केंद्रावर मोफत मदत मिळते.
  • कागदपत्रांची पडताळणी: तुमच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत का, हे तुम्ही येथे तपासून घेऊ शकता.
  • Google Map लोकेशन: शाळेचे Google Location चुकत असल्यास, पालकांसाठी दुरुस्ती करण्याची सोय मदत केंद्रांवर उपलब्ध असते.
  • तक्रार निवारण: RTE प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार असल्यास तुम्ही ती येथे नोंदवू शकता.

सोबत काय आणावे? (Required Documents)

मदत केंद्रावर जाताना खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स सोबत ठेवा:

  • बाळाचा जन्म दाखला (Birth Certificate)
  • अधिवास प्रमाणपत्र / रहिवासी पुरावा (Address Proof)
  • जातीचा दाखला (Caste Certificate - जर लागू असेल तर)
  • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate - EWS साठी)
  • आधार कार्ड (पालक व बालक)

महत्वाचे सूचना

  • • प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र हेल्प सेंटर उपलब्ध आहेत
  • • हेल्प सेंटर कार्यालयीन वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00
  • • आपल्या जवळच्या हेल्प सेंटरला भेट देण्यापूर्वी फोन करून खात्री करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

हेल्प सेंटरची मदत घेणे गरजेचे आहे का?

नाही, हे अनिवार्य नाही. जर तुम्ही स्वतः ऑनलाइन फॉर्म भरू शकत असाल आणि तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर असतील, तर तुम्हाला मदत केंद्रावर जाण्याची गरज नाही. फक्त अडचण असल्यास किंवा शंका असल्यास तिथे जावे.

RTE मदत केंद्रावर फॉर्म भरण्यासाठी पैसे लागतात का?

नाही, RTE मदत केंद्रांवर (Help Desk) दिली जाणारी मदत पूर्णपणे मोफत असते. कोणीही पैशांची मागणी केल्यास, तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता.

मी दुसऱ्या जिल्ह्याच्या मदत केंद्रावर जाऊ शकतो का?

शक्यतो तुमच्याच जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या मदत केंद्रावर जाणे सोयीचे ठरेल, कारण त्यांच्याकडे स्थानिक शाळांची आणि गुगल मॅप लोकेशन्सची अधिक अचूक माहिती असते.

मदत केंद्रे सुट्टीच्या दिवशी चालू असतात का?

RTE मदत केंद्रे सामान्यत: सरकारी कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते सायं 6) आणि कामाच्या दिवशी चालू असतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असू शकतात.

Join Channel RTE Updates मिळवा