RTE Admission Maharashtra Classroom
संपूर्ण मार्गदर्शक 15 जानेवारी 2025 12 मिनिटे वाचन

RTE 25% Admission Maharashtra 2026-27 – Complete Guide (मराठीत)

(सोप्या, समजण्यासारख्या भाषेत)

RTE म्हणजे काय?

RTE म्हणजे Right to Education, म्हणजे सर्व मुलांना मोफत आणि चांगले शिक्षण मिळण्याचा हक्क. या कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये 25% जागा वंचित आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुलांसाठी राखीव आहेत.

महाराष्ट्रात दरवर्षी लाखो पालक आपल्या मुलांसाठी RTE 25% Admission साठी अर्ज करतात. हा लेख तुम्हाला 2026-27 च्या पूर्ण प्रवेश प्रक्रियेबद्दल साध्या, सोप्या शब्दांत मार्गदर्शन करेल.

महत्वाचे: RTE अंतर्गत प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. शाळा कोणतीही फी घेऊ शकत नाही.

RTE 25% Admission 2026-27 कोणासाठी आहे?

तुमच्या मुलाला RTE मधून प्रवेश मिळू शकतो, जर:

  • तुमचे घरचे वार्षिक उत्पन्न ₹1,00,000 किंवा कमी असेल
  • तुमचे मूल SC / ST / OBC / SBC / VJ / NT या जातींपैकी असेल
  • मूल दिव्यांग (40% पेक्षा जास्त) असेल
  • मूल अनाथ असेल
  • मूल Covid-प्रभावित असेल (पालकाचा मृत्यू 2020–2022 दरम्यान)
  • मूल HIV प्रभावित/बाधित असेल

जर तुमचे मूल आर्थिक दुर्बल गट (EWS) मध्ये येत असेल, तोदेखील अर्ज करू शकता.

RTE Admission 2026-27 मध्ये मुले कोणत्या इयत्तेत प्रवेश घेऊ शकतात?

साधारणपणे RTE प्रवेश खालील वर्गांसाठी असतो:

  • नर्सरी / LKG / UKG (पूर्व-प्राथमिक)
  • इयत्ता 1ली

मुलाची जन्मतारीख आणि वयोमर्यादा शासनाच्या नियमांनुसार तपासली जाते.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

RTE साठी अर्ज करणे खूप सोपं आहे. सगळं ऑनलाइन होणार आहे.

Step-by-Step प्रक्रिया

  1. Step 1: अधिकृत वेबसाइट उघडा: student.maharashtra.gov.in
  2. Step 2: मोबाईल नंबर टाका → OTP येईल → Verify करा
  3. Step 3: मुलाची माहिती भरा (नाव, जन्मतारीख, लिंग, पालक माहिती)
  4. Step 4: तुमच्या घराचा पत्ता भरा आणि Google Map वर घराचे location अचूक सेट करा (ही पायरी खूप महत्वाची आहे)
  5. Step 5: तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळा निवडू शकता. Portal तुमच्या घरापासून 1 KM / 3 KM अंतरातील शाळांची यादी दाखवतो
  6. Step 6: सर्व माहिती तपासा → Confirm Application करा आणि प्रिंट काढा

कागदपत्रे कोणती लागतात?

अर्ज करताना कागदपत्रे Upload करायची नसतात. पण निवड झाल्यावर पडताळणीसाठी लागतात.

सर्वांना आवश्यक कागदपत्रे:

  • जन्मतारखेचा पुरावा (Birth Certificate)
  • पत्ता पुरावा (Aadhaar / Light Bill / Bank Passbook / Rental Agreement)
  • आधार कार्ड किंवा आधार नोंदणी पावती

Category नुसार:

  • जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/SBC/NT/VJ)
  • उत्पन्नाचा दाखला (EWS साठी)
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • अनाथ प्रमाणपत्र
  • Covid-प्रभावित मुलांचे पुरावे

लक्षात ठेवा: सर्व कागदपत्रे स्कॅन करून PDF format मध्ये तयार ठेवावीत. प्रत्येक document चा size 200 KB पेक्षा कमी असावा.

शाळांची निवड कशी होते?

तुम्ही निवडलेल्या शाळा Portal तुमच्या घरापासूनच्या अंतरावर ठरतात:

  • 1 KM → सर्वात जास्त प्राधान्य
  • 1–3 KM → दुसरे प्राधान्य
  • 3 KM पेक्षा जास्त → तिसरे प्राधान्य

शाळेतील जागा जास्त आणि अर्ज कमी असतील तर मुलाला थेट प्रवेश मिळू शकतो. जागा कमी आणि अर्ज जास्त असतील तर Lottery (Sodati) होते.

Lottery म्हणजे काय?

Lottery म्हणजे RTE मध्ये निवड प्रक्रिया. हा पूर्णपणे Computer-Based Random System आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.

Lottery मध्ये 1 KM चे विद्यार्थी, यानंतर 1–3 KM, मग बाकी विद्यार्थी अशा Priority ने निवडले जातात.

तुमच्या मोबाइलवर SMS येतो आणि Portal वरही परिणाम दिसतो.

निवड झाल्यावर काय करायचे?

जर तुमचा मुलगा/मुलगी निवड झाली असेल:

  1. Portal वरून Allotment Letter डाउनलोड करा
  2. सर्व कागदपत्रे घेऊन जवळच्या Verification Center ला जा
  3. पडताळणी पूर्ण झाल्यावर
  4. शाळेत जाऊन अंतिम प्रवेश करा

Verification न केल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.

Waiting List म्हणजे काय?

जर प्रथम Lottery मध्ये तुमच्या मुलाचे नाव आले नाही, तर मुलाचे नाव Waiting List मध्ये जाऊ शकते.

शाळांमध्ये जागा रिकामी झाल्या तर Waiting List मधून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

अर्जाची स्थिती कशी तपासायची?

Portal वर "Application Wise Details" मध्ये तुमचा अर्ज क्रमांक टाका.

तिथे तुम्हाला Status मिळेल:

  • Selected - निवड झाली
  • Waiting - प्रतीक्षा यादीत
  • Not Selected - निवड झाली नाही
  • Admitted - प्रवेश पूर्ण

RTE मधून प्रवेश मिळाला नाही तर?

अशी परिस्थिती आली तर:

  • पुढील Waiting List ची वाट पहा
  • इतर शासकीय योजना पाहा
  • जवळच्या शाळांमध्ये उपलब्ध Fee Concessions बद्दल विचार करा

पालकांसाठी काही महत्वाच्या सूचना

  • फॉर्म Confirm करण्याआधी पत्ता नीट तपासा
  • Google Map Location योग्य सेट करा
  • Caste/Income प्रमाणपत्र परराज्यातील नको
  • SMS न आल्यास Portal वरून Status तपासा
  • वेळेवर पडताळणी करा
  • शाळा बदलण्याची परवानगी नसते

अधिक माहितीसाठी आमच्या FAQ पेज ला भेट द्या किंवा प्रवेश प्रक्रिया पेज वाचा.

ही माहिती शेअर करा:

Join Channel RTE Updates मिळवा